पंतप्रधान मोदींनी मावळ गोळीबाराची चौकशी करावी : अजित पवार

पुणे (प्रतिनिधी) मावळ गोळीबाराच्या सूचना मी दिल्याचे खरे ठरले, तर मी राजकारणातून निवृत्त होईन. मी माझी राजकीय कारकिर्द पणाला लावण्यास तयार आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनीही त्यांची राजकीय कारकिर्द पणाला लावून चौकशी अहवाल जनतेसमोर ठेवला पाहिजे,’ असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. काँग्रेस भवन येथे आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर पवार यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा समाचार घेतला.

 

वर्धा येथे पंतप्रधान मोदी यांनी पवार कुटुंबीयांवर झालेल्या आरोपांचे खंडन करताना त्यांनी मावळ गोळीबाराबाबत पंतप्रधानांना चुकीची माहिती दिल्याचे सांगितले. ‘देशाचे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात तपास यंत्रणा आहेत. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी या चौकशीमध्ये माझ्याविरोधात कुठलेही संभाषण अथवा पोलिस अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्याचे काही आढळल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन. त्यांनी राजकीय कारकीर्द पणाला लावून चौकशी अहवाल जनतेसमोर ठेवला पाहिजे. देशात आज विविध प्रश्न असताना पंतप्रधान मोदी विकासावर न बोलता पवार कुटुंबीयांवर बोलत आहेत. सुसंस्कृत देशाचे पंतप्रधान असे काही बोलतील असे वाटले नव्हते. काही वर्षांपूर्वी विकासाबद्दल बोलणारे पंतप्रधान आता त्याला फाटा देऊन आमच्या घरावर उतरले,असल्याचेही अजित पवार म्हणाले.

Add Comment

Protected Content