डोंगरदे येथे नियमीत आरोग्य सेवा सुरु करण्याची मागणी

a756c541 ef10 459f af91 25e3e5f8b58e

यावल (प्रतिनीधी) तालुक्यातील डोंगरकठोरा ग्रुप ग्राम पंचायतीस असलेल्या डोंगरदे या आदिवासी वस्तीवर आरोग्य सेवा नियमीत सुरु करावी. या मागणीचे निवेदन सरपंच यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे दिले आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या आदीवासी गावात मागील पंधरवाड्यात अज्ञात आजाराने तीन लहान मुल दगावली होती.

 

या बालकांच्या अचानक मृत्युमुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. या पार्श्वभुमीवर आज (३ एप्रील) डोंगर कठोरा येथील सरपंच सौ. सुमनताई वाघ यांनी भालोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन वायकोळे व आरोग्य सेविका लता चौधरी यांना लेखी निवेदन देवुन भविष्यात डोंगरदे येथील आदिवासी बांधवांना अशा गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येवु नये, यासाठी आरोग्य विभागाने दर महिन्याला आरोग्य शिबिराचे नियोजन करावे आणि स्वच्छता व आरोग्यासंदर्भात युद्धपातळीवर जनजागृती मोहीम राबवावी, अशा मागणीचे पत्र दिले आहे.

Add Comment

Protected Content