किनगाव येथे तीन दिवशीय पर्जन्य याग

यावल प्रतिनिधी । पंचक्रोशीसहीत संपुर्ण महाराष्ट्रात सुवृष्टी व्हावी व समस्त जगजीवनाच्या सुख समृद्धीसाठी किनगाव खुर्द येथील ग्रामदेवता गुरूदत्त मंदीरात तीन दिवसांचा पर्जन्य याग आयोजीत करण्यात आले आहे.

यात पहिल्या दिवशी प्रायचित्त,प्रधान संकल्प,गणपती पुजन,पुष्पाहवाचन,पंचांगकर्म दुसऱ्या दिवशी स्थापित देवता प्राप्त पुजन,महाअभिषेक,प्रधान यजन उत्तरांग हवन आरती तर तिसऱ्या दिवशी स्थापित देवता प्रातःपुजन अभिषेक बक्षीदान पुर्णाहुती आरती प्रसाद असा कार्येक्रम होत संपन्न होणार आहे. तर महाअभिषेक कार्येक्रम किनगाव गावातील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत चौधरी, केतन चौधरी, सरपंच भुषण पाटील, पुरूषोत्तम पाटील ,रोहिदास पाटील व राजेंन्द्र पाटील यांनी सहपत्नि होमहवन पुजा केली तसेच गुरूपोर्णीमेनिमीत्ताने दि.२३ जुलै रोजी मंदिरात महाप्रसादाच्या कार्येक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी परीसरातील भावीकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त किनगाव ग्रामस्थ मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Protected Content