अग्रवाल चौफुलीवर रुंद बोगदा करा : मनसेची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । नॅशनल हायवे क्रमांक-६ चे काम शहरात सुरु असून यात अग्रवाल चौफुलीवर अंडरपासचे काम ठेकेदाराने हाती घेतले आहे.  हा अंडरपास बोगदा अरुंद असून त्याची रुंदी वाढवावी किंवा तेथे दुसरा अंडरपास बोगदा  देखील बांधण्यात यावा  अशी मागणी मनसेतर्फे राजेंद्र निकम  यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

 

अग्रवाल चौफुली परिसारत हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते.  जास्त वर्दळ असतांना येथे अरुंद बोगदा तयार करण्यात येत आहे. गुजराल पेट्रोल पंप, अष्टभुजा चौफुली येथे दोन अंडरपास बोगदे तयार करण्यात आले आहेत. मात्र, अग्रवाल चौफुली येथे केवळ एकच ६ मीटरचा बोगदा तयार केला जात आहे. कमी रुंदीचा बोगदा असल्याने भविष्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. संबधित ठेकेदाराला या अंडरपास बोगद्याची रुंदी वाढविण्याची किंवा दोन बोगदे तयार करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.   याबाबत लवकरात लवकर म्हणजे १० ते १५ दिवसाचे आत योग्य तो निर्णय घेतला न गेल्यास मनसेतर्फे   अग्रवाल चौफुली येथे तीव्र आंदोलन करुन काम बंद पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी  शहर संघटक निलेश अजमेरा, उपसंघटक गोविंद जाधव, विशाल कुमावत, तालुका संघटक गणेश नेरकर,तालुका उपसंघटक महेश माळी भुसावळ तालुका संघटक दिनेश चव्हाण जळगाव तालुका उपसंघटक गोरख गायकवाड यांचेसह महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.

 

Protected Content