राजकारण मतांसाठी नाही तर विकासासाठी – मंगेश चव्हाण (व्हिडिओ)

mangesh chavhan

चाळीसगाव, प्रतिनिधी | आता राजकारण मतांसाठी नाही तर विकासासाठी असल्याचे प्रतिपादन मंगेश चव्हाण यांनी केले. ना. गिरीश महाजन म्हणाले होते की, मला ५० हजारांचा लीड मिळेल. मात्र, याबाबत आपल्याला शंका होती. आपल्या उपस्थितीने मला ५० हजारांचा लीड नक्की मिळेल याबाबत विश्वास झाला असल्याचे भाजपचे चाळीसगाव मतदारसंघाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी मत व्यक्त केले. ते कुंझर येथे गुरुवार (दि. १७) रोजी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

चाळीसगाव मतदारसंघाच्या विकासासाठी ब्लू प्रिंट तयार आहे. याची अंमलबजावणी कशी करता येईल याकडे जातीने लक्ष देईल असे मंगेश चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले. काही कामांना शासकीय प्रक्रियेमुळे वेळ लागत असतो परंतु, ही प्रक्रिया लवकर कशी पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे व्यक्तव्य चव्हाण यांनी केले. कमीत कमी काळात प्रश्न कसे मार्गी लागतील याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली. या जाहीर सभेत नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, सकाळी परिसरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार रॅली ला नागरिकांनी   उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रॅॅलीत सहभाग घेतला.

Protected Content