एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे यावल आगाराचा ४० लाखाचा महसूल बुडाला

जळगाव प्रतिनिधी । राज्यव्यापी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात यावल आगारातील कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग नोंदविला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे यावल आगराचे ४० लाखांचा महसूल बुडाला आहे.

 

यावल आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद संप पुकारला आहे. या संपात यावल आगारातील ३३६ हून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.  चार दिवसापासून अचानक राज्यव्यापी संपात सहभागी झाल्याने यावल आगाराचे सुमारे ३५ ते ४० लाखांचे उत्पन्न बुडाले.  ऐन दिवाळी काळात पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठया प्रमाणावर हाल होत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे या संपाच्या गोंधळामुळे अवैद्य प्रवासी वाहतुक करणारी मंडळीला सुगीचे दिसुन आले आहे. दरम्यान एसटी महामंडळाची बससेवा पुर्ण ठप्प झाल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर विविध वाहतुदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधुन स्कुल बसेस किंवा खाजगी बससेवा स्थानिक बसस्थानकावर सुरू देण्यासाठी जिल्हा उपप्रादेशीक परिवाहन यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांना संपर्क प्रमुख म्हणुन  नियुक्त करण्यात आले आहे. या संदर्भात यावल एसटी आगारातुन आगार व्यवस्थापक शांताराम भालेराव यांनी खाजगी बस वाहतुदारांशी संपर्क केला आहे.

Protected Content