शेंदुर्णी येथे आचार्य गरुड यांच्या स्मृती-प्रित्यर्थ रक्तदान शिबीर

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील धी शेंदूर्णी सेकं.एज्यु. को-ऑप सो.लि.शेंदूर्णी संचलित अप्पासाहेब र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो एककाच्या व आचार्य प्रतिष्ठान शेंदूर्णीच्या वतीने कै.आचार्य गरुड यांच्या स्मृती-प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन आ.ग.र.ग.प्राथमिक विद्यामंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दादासो संजयजी गरुड हे होते हे होते. रक्तदान शिबिराच्या प्रमुख उद्घाटनपदी शेंदूर्णी नगरीच्या नगराध्यक्षा विजयाताई खलसे ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सतीश काशीद व संस्थेच्या संचालिका उज्ज्वला काशीद ह्या होत्या. ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.ग.ग.प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौदामिनी गरुड यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रमात प्राथमिक शाळेच्या राजश्री ओव्हाळ, तनिष्का सुर्यवंशी, मनीष पाटील, प्रतीक बोंडे, तनुश्री साळुंखे, श्रावण गरुड, अवनी दवंगे, अवनी चौधरी, भैरवी गरुड, सई मराठे या विद्यार्थ्यांनी कै. बापूसाहेब गरुड यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.

या नंतर संस्थाध्यक्ष संजय गरुड यांनी उपस्थितांना आचार्य बापूसाहेबांच्या तेजस्विता, तपस्वीता ह्या गुणांचा आढावा घेत गत स्मृतींची उजळनी केली. तसेच आपल्या अध्यक्षिय मनोगतातून कै.बापूसाहेबांप्रती आपला कृतज्ञता भाव व्यक्त केला. यानंतर त्यांनी व नगराध्यक्षा यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरात उल्लेखनीय बाब म्हणजे कै. बापूसाहेबांच्या कन्या व संस्थेच्या संचालिका उज्ज्वलाताई काशीद यांनी स्वतः रक्तदान करून  रक्तदान करण्याची प्रेरणा उपस्थितांना दिली. या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय शासकीय रक्तपेढी जळगाव व रेड प्लस रक्तपेढी जळगाव यांनी सकाळी 9:00 ते दुपारी 1:00 दरम्यान रक्तसंकलन केले.

रक्तदानशिबिरात एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण राठोड व आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले. या शिबिरच्या उद्घाटन प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक सगरमलजी जैन, संस्थेचे संचालक अभिजित काशीद, देवश्री काशीद, संस्थेचे सहसचिव भाऊसाहेब सो.दिपकजी गरुड, आचार्य प्रतिष्ठान अध्यक्ष व वसतिगृह सचिव कैलास देशमुख, अमृतबापू खलसे, शेरू काझी, शांताराम गुजर, यु.यु.पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो सहाययक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.ए.एन.जिवरग, रासेयो महिला सहाययक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील, शिक्षक वृद एस.व्ही. काटे, पंकज चौधरी, एस.बी.गरुड,सेवक बाळू पाटील व सर्व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content