चिंचोली व परिसरातील शेतीला सुरळीतपणे वीज पुरवठा करा (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मधील चिंचोली व परिसरातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या वीज समस्येवर ताबडतोब उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

जळगाव ग्रामीण मधील चिंचोली व परिसरातील शेतकऱ्यांचा अनेक दिवसांपासून सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले असेल त्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा ताबडतोब सुरु करण्यात यावा. तसेच जे शेतकरी एक एक बिल भरणार असतील त्यांचा सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी जिल्हा बँक चेअरमन गुलाबराव देवकर यांनी कार्यकरी अभियंता केली आहे.

जळगाव ग्रामीण मधील चिंचोली व परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून शेतीविज समस्या भेडसावत आहे. त्यांना दुबार पेरणीला करून १५ दिवस झाले आहेत. मागील १५ दिवसांपासून सतत विजेचा लपंडाव, अनियमितता सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने आज जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर व राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. पांडुरंग पाटील यांच्या सह शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन वीज समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी शेतीपंपाला पुरेशा दाबाने वीज पुरवठा करावा,रात्रीची लोडशेडिंग बंद करा, शेती पंपाला ८ तास ऐवजी १२ तास वीज पुरवठा द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा युवक सरचिटणीस अनिल खडसे,शिवाजी धनगर, ज्ञानेश्वर मांडे, हर्षल राणे,समाधान पाटील,मुकुंदा पाटील, पोपट कोलते आदी शेतकरी उपस्थित होते.

 

भाग १

भाग २

Protected Content