धावत्या रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या प्रौढाची ओळख पटली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत अनोळखी प्रौढ व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याचा मृतदेह रविवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता म्हसावद ते बोरनार दरम्यान असलेल्या रेल्वेलाईनवर आढळून आला होता. मयताची ओळख पटली असून राजेंद्र पंडीत पाथरवट (वय-५५, रा. पाथरी ता. जळगाव) असे त्यांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील पाथरी येथे रविंद्र पाथरवट हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते गावाजवळील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते घरात कोणाला काहीही एक न सांगता घरातून निघुन गेले. यावेळी घरच्यांना ते कामावर गेले असावे असे वाटले. तसेच रात्री देखील पाथरवट हे घरी परतले नाही. रविवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा गावात शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना शनिवारी म्हसावद ते बोरनार दरम्यान डाऊनलाईनवरील खांबा क्रमांक ३९७/१७ ते १९ दरम्यान अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. गावातील काही नागरिकांनी त्यांचा मुलगा चेतन याला सोबत घेवून शासकीय रुग्णालयात आले. यावेळी त्यांच्या मुलाने वडीलांचे चप्पल आणि अंगातील शर्टावरुन ते आपलेच वडील असल्याचे ओळखले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे.

Protected Content