Home Cities जळगाव पर्यावरणासाठी महिला प्राध्यापकांची अनोखी भेट; सुबोनियो पक्षी घरात २०० बोगनवेलींचे वृक्षारोपण

पर्यावरणासाठी महिला प्राध्यापकांची अनोखी भेट; सुबोनियो पक्षी घरात २०० बोगनवेलींचे वृक्षारोपण

0
6

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “सुंदर जळगाव – हिरवेगार जळगाव” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत मराठी प्रतिष्ठान, जळगाव आणि सुबोनियो परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरून तलाव परिसरातील सुबोनियो पक्षी घर येथे २०० बोगनवेलींचे वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी सर्व बोगनवेली शिक्षकी पेशातील महिला प्राध्यापकांनी वृक्षदान स्वरूपात उपलब्ध करून दिल्या.

मराठी प्रतिष्ठानने काही दिवसांपूर्वी “बोगनवेल वृक्षदान” उपक्रमाचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत माजी प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी १००, प्रा. पुनम मानधने यांनी ५०, प्रा. सविता नंदनवार यांनी २९, प्रा. डॉ. विजेता सिंग यांनी १०, प्रा. डॉ. रत्नप्रभा महाजन यांनी ७ आणि प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी ४ बोगनवेलींचे वृक्षदान केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. “झाडे लावा… झाडे जगवा…” हा संदेश देत प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. मराठी प्रतिष्ठानतर्फे सर्व वृक्षदात्या महिला प्राध्यापकांचा विशेष सत्कारही करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या विश्वस्त प्रा. सविता नंदनवार यांनी सुबोनियो पक्षी घर परिसरातील वृक्षसंवर्धनाची माहिती देत प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास महानगरपालिका पर्यावरण विभाग प्रमुख प्रकाश पाटील, वसंत पाटील, “माझे शहर माझी जबाबदारी” अभियानाचे संयोजक सुहास दुसाने, उद्योजक सुबोध चौधरी, सुनील चौधरी, सुयोग चौधरी, सौ. हिरा चौधरी, सौ. सारिका चौधरी, डॉ. सृष्टी चौधरी, सुमोल चौधरी, हर्ष चौधरी, संजना चौधरी, राजेश चौधरी, लीना चौधरी, अर्चना नेमाडे पाटील, उडान संस्थेच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, निलोफर जमील देशपांडे, रूबीना अल्ताफ देशपांडे, उद्धव महाजन, दीपक धांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी वृक्षारोपणाइतकेच वृक्षसंवर्धन महत्त्वाचे असल्याचे सांगत, जळगाव शहर अधिक हिरवेगार करण्यासाठी असे उपक्रम भविष्यातही सुरू राहतील, असे स्पष्ट केले. या उपक्रमामुळे सुबोनियो पक्षी घर परिसराचे सौंदर्य खुलणार असून पर्यावरण संवर्धनासाठी समाजाला प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound