धुडकू सपकाळे हल्ला : ‘बदले की आग’ अन् गेम करायचा प्लान !

dfe619aa a4e6 4290 9f33 9319d898051f

जळगाव प्रतिनिधी । भर दिवसा धुडकू सपकाळेंसह एकावर करण्यात आलेला हल्ला हा बाजार समितीतल्या हमाल-मापाडी संघटनेच्या वर्चस्वाच्या स्पर्धेतून पंधरा दिवसापूर्वी झालेल्या हाणामारीचा बदला घेण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याची नवीन माहिती समोर आली आहे.

 

 

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हमाल-मापाडी संघटनेचे नेते तसेच नगरसेविका मीना सपकाळे यांचे पती धुडकू सपकाळे आणि गजानन देशमुख या दोघांवर आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला होता. कॉमेश सपकाळे याचा नितीन नामक मामासोबत पंधरा दिवसापूर्वी धुडकू सपकाळे यांचा वाद झाला होता. यावेळी दोन्ही गटात हाणामारी देखील झाली होती. एमआयडीसी पोलीस स्थानकात आल्यावर मात्र, दोन्ही गटात समजोता झाला होता. परंतू कॉमेशने त्याच्या मामासोबत झालेल्या हाणामारीचा बदला घेण्याचा प्लान आखला. त्यानुसार रेकी करून धुडकू सपकाळे एकटे गाठून गेम करायचा होते. परंतू घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला व गर्दी जमा झाल्यामुळे हल्लेखोरांनी पळ काढला.

 

सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात

 

धुडकू सपकाळे यांच्यावर एमआयडीसी परिसरातील ज्या राका चौकात हल्ला झाला. त्याठिकाणी एक खाजगी बंगल्याच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता. या कॅमेरात संपूर्ण घटना अगदी स्पष्टपणे कैद झाली आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी सीसीफुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे घटनेत किती लोकं होते? कोणत्या वाहनातून आलेत? आणि कसा हल्ला चढविला? याची संपूर्ण माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली आहे.

Protected Content