पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; तालुका पोलीसात पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । विवाहितेने माहेरहून ५ लाख रुपये आणि ८ तोळे सोने आणावे यासाठी पतीसह सासरच्या लोकांनी छळ करण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून विवाहितेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, हेमाली हर्षल नेमाडे (वय 28) रा. गिरणा कॉलनी पाटबंधारे कार्यालयजवळ जळगाव ह.मु. आसोदा ता. जि. जळगाव यांचा विवाह 28 मे 2015 रोजी हर्षल रमेश नेमाडे यांच्यासोबत झाला. लग्नानंतरचे ४ महिने चांगले गेले. त्यानंतर पती हर्षल नेमाडे याने माहेरहून ५ लाख रुपये आणि ८ तोळे सोने आणावे यासाठी विवाहितेला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. परंतु आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे पैशांची व सोन्याची पूर्तता करू शकत नाही. त्यामुळे तिला पती हर्षल नेमाडे याने मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यासह घरात सासू निर्मला रमेश नेमाडे, दिर मयूर रमेश नेमाळे, ननंद हेमलता जितेंद्र चौधरी रा.  नाशिक माम सासरे मधुकर मधुकर राणे आणि प्रतिभा राणे यांनी मानसिक छळ करून विवाहितेचा गांजापाठ केला. या छळाला कंटाळून हेमाली नेमाडे या जळगाव तालुक्यातील कासोदा येथे माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून काल शनिवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता पतीसह इतर ६ जणांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक बापू कोळी करीत आहे.

Protected Content