ट्रकने दुचाकीला उडविले; तरूण ठार; एक जण जखमी

चाळीसगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने धावणार्‍या ट्रकने मागून दुचाकीला उडविल्याने एक जणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

हि घटना दि,२९ रोजी संकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. मयताचे नाव सागर शिवाजी शिंदे(धनगर)असे नाव आहे. खडकी लगत असलेल्या मेंढ्याच्या वाड्यावर औरंगाबाद-धुळे चौफुलीवर खडकी येथून मेढयाच्या वाड्यावर सागर व मयुर हे दोन्ही तरुण दुचाकीने( क्र, एमएच,१७,एवाय २८१७) जात असताना, औरंगाबादकडुन धुळे येथे जाणार्‍या ट्रकने (क्र,जीजे, २५ व्यु ५२५८) दुचाकीला मागुन जोरदार धडक दिली. अपघात इतका जबरदस्त होता की, दुचाकीस्वार सागर व मयुर हे लांब अंतरावर फेकले गेले. यात दोघांना गंभीर मार लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता, सागर याला डॉक्टारांनी तपासून मयत घोषीत केले. 

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला समाधान पुंजु शिंदे यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालक देवलभाई रमेशचंद्र गोहेल रा.खडविस्तार, पोरबंदर, गुजरात यांच्यावर गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

 

Protected Content