हिंगणे शिवारातून ठिंबकच्या नळ्यांची चोरी; बोदवड पोलीसात गुन्हा

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील नांदगाव येथील शेतकऱ्यांची शेतातून २५ हजार रुपये किमतीचे ठिंबक नळ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, बाबा दत्तात्रय शिरसाठ (वय-४७, रा.नांदगाव ता.बोदवड) यांचे हिंगणे शिवारातील शेतात 25 हजार रुपये किमतीचे ठिंबकच्या नळ्या व बंडल असा एकूण मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी शेतातून 24 एप्रिल ते 1 मे दरम्यान चोरून नेला आहे. या प्रकरणी आबा शिरसाट यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कालीचरण बिऱ्हाडे करीत आहे.

Protected Content