Home क्राईम विटनेर येथे विजेचा शॉक लागून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; चोपडा परिसरात...

विटनेर येथे विजेचा शॉक लागून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; चोपडा परिसरात हळहळ

0
15

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील विटनेर येथे राहत्या घरी विजेचा शॉक लागल्याने कृष्णा तुकाराम पाटील (वय १७) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्यापूर्वी ही घटना घडली. या घटनेमुळे विटनेर गावात हळहळ व्यक्त होत असून, एका तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात दुःखाचे वातावरण आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा पाटील हा विटनेर येथे आपल्या राहत्या घरी असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. ही बाब लक्षात येताच त्याच्या नातेवाइकांनी आणि गावातील नागरिकांनी त्याला तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांनी कृष्णा पाटील याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणी चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पवन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार हेमंत कोळी करीत आहेत.


Protected Content

Play sound