आदिवासी पारधी महासंघाचे चिंतन शिबिर

जळगाव प्रतिनिधी । आदिवासी पारधी महासंघातर्फे व. वा. वाचनालयात एक दिवसीय पारधी समाज चिंतन शिबिर पार पडले.

या शिबिरात आदिवासी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, २०२२पर्यंत सर्व पारधी कुटुंबांना घरकुल व शेतजमीन मिळावी, सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे, पारधी समाजाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणे, विभागीय मेळाव्यांचे आयोजन करणे, नोकरी मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, गुणवंतांचा गौरव करणे आदी विषयांवर अप्पासाहेब साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी राज्य संघटक बन्सीलाल पवार, सचिव रमेश चव्हाण, महिला अध्यक्षा कांचन राणे, मुकेश साळुंखे, दीपक खांदे, वाल्मीक पवार, वासुदेव चव्हाण, जिल्हाध्यक्ष सीताराम पारधी, उखर्डू साळुंखे, सचिन साळुंखे आदी उपस्थित होते. सुनील दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला समाजबांधवांची उपस्थिती होती.

Protected Content