वंजारी समाजातर्फे गुणगौरव सोहळा

जळगाव प्रतिनिधी । येथील लाडवंजारी समाज मंगल कार्यालयात वंजारी युवा संघटना व वंजारी सेवा संघ यांच्या सुंयक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आणि प्राचार्य डॉ. सुरेश वराडे यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितांमध्ये प्रा. वा.ना. आंधळे, प्रवीण गीते, अंजली केंद्रे, वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, वंजारी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल फड, अभियंता विजयानंद काळे, गणेश चाटे, के.बी.पाटील, सुशीला पाटील, वंदना पालवे, प्रिती चाकोर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्रा. वा.ना. आंधळे यांनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. प्रास्ताविकात युवा संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक प्रशांत नाईक यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. दहावीत प्रथम आलेला मयूर विठ्ठल देशमुख यासह मोहित नाईक यास या शैक्षणिक कार्यक्रमात सायकल भेट देण्यात आली.

या कार्यक्रमात किर्तनकार अंजली केंद्रे, अरुण सानप, सोमनाथ सानप, हिमांशू बढे यांचा समाजभूषण व समाजवैभव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सतीश सांगळे, योगेश घुले, चंद्रकांत लाड, विकास लाडवंजारी यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. उपाध्यक्ष नामदेव वंजारी यांनी सूत्रसंचालन केले. महादू सोनवणे, भानुदास नाईक, उमेश वाघ, सचिन ढाकणे, सुधीर नाईक, उमेश आंधळे, किशोर पाटील, गणेश वंजारी, राहुल वंजारी, संतोष चाटे, कृष्णा पाटील, विलास घुगे, गोविंदा इंगळे यांनी नियोजन केले.

Protected Content