जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील ताडे येथे आयोजित हळदी समारंभात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
३ मे रोजी ताडे येथे हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पडत असताना लखन प्रकाश वाघ (रा. पथराडे, ता. पाचोरा) हा युवक कार्यक्रमात उपस्थित होता. रात्री उशिरा बँडवर नाचताना काही नागरिकांच्या नजरेस त्याच्या कमरेला गावठी कट्टा दिसून आला. याबाबत विचारणा होताच आरोपीने गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकाराची माहिती तत्काळ कासोदा पोलीस ठाण्याला देण्यात आली.

घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे ४ मे रोजी आरोपी पुन्हा ताडे गावात संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. यानुसार पोलिसांनी सापळा रचून भातखेडे चौफुली परिसरातून आरोपी लखन वाघ याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धर्मराज गायकवाड, पोकॉ. निलेश गायकवाड, योगेश पाटील, सोनू पाचुंदे यांच्या पथकाने केली. करण्यात आली. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



