Home Cities जळगाव संत शिरोमणी श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी दिंडी

संत शिरोमणी श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी दिंडी

0
119

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्री संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथीनिमित्त अयोध्या नगर परिसरामध्ये पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या बुधवार, दि २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे. श्री संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अयोध्या नगर येथील संतोष इंगळे यांच्या अपना घर कॉलनी येथून दिंडीला सुरुवात होणार आहे. ही दिंडी सिद्धिविनायक विद्यालय, राम मंदिर मार्गाने कासार मंगल कार्यालयात पोहोचेल.

या ठिकाणी जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार असून भागवत महाराजांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound