शिरसोलीत कारच्या काचा फोडून नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात कारने गोऱ्ह्याला धडक दिल्याने तरूणासह इतर अनोळखी तीन जणांनी कारच्या पुढील व मागच्या बाजूच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जावेद अहमद युनूस पिंजारी (वय-३४) रा. उर्दू शाळेच्या मागे, शिरसोली ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वस्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जावेद अहमद हा त्याची कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही ७४३९) ने घरी जात असतांना एका गोऱ्ह्याला धडक दिली. याचा राग आल्याने महेश अरूण पाटील याच्यासह इतर तीन जणांनी जावेद अहमद यांच्या कारच्या पुढच्या आणि मागच्या बाजूच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. हा प्रकार घडल्यानंतर जावेद अहमद याने मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात महेश अरूण पाटील याच्यासह इतर अनोळखी तीन जणांविरोधात अदखलपात्र  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

Protected Content