हिंगोणा येथील मोर धरणात गुराख्याचा पाण्यात बुडून मृत्यू

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा शिवारातील असलेले मोर धरणाच्या काठावर गुरे चारणाऱ्या गुराख्याचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील मोर धरण येथील रहिवाशी गुलशेर सुमाऱ्या बारेला (वय-५२) हे आदीवासी व्यक्त गुरे चारण्याचे काम करतात. २२ ऑक्टोबर रोजी ते हिंगोणा शिवारातील मोर धरणाजवळ गुरे चारत असतांना त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. त्यावेळी सोबत कुणीही नव्हते. दरम्यान दुसऱ्या दिवशी २३ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला आहे. मृतेदह कुजलेला असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांनी जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले. हिंगोणा येथील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी फैजपूर पोलीस ठाण्याला ही माहिती दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरेश्वर आखेगावकर, पोहेकॉ सुरदास चाटे यांनी भेट दिली. पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content