डॉ. पायल तडवी यांनाआत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या फरार तरुणींना अटक करण्याची मागणी

WhatsApp Image 2019 05 25 at 9.53.00 PM

यावल (प्रातिनिधी) मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉ.पायल तडवी यांनी रॅगींगच्या छळाला कंटाळुन केलेल्या आत्महत्यास नायर हॉस्पीटल मुंबई व आग्रीपाडा मुंबई, पोलीस प्रशासनाची दिरंगाई जबाबदार असल्याचे सांगुन या प्रकरणात फरार असलेल्या तिघ तरूणींना तात्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आदीवासी तडवी भिल्ल एकता संघा,चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एम.बी. तडवी यांनी दिला आहे.

या संदर्भात मुलाखतीत आदीवासी तडवी भिल्ल एकता संघाचे अध्यक्ष एम.बी. तडवी यांनी सांगीतले की, जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी व नायर हॉस्पीटल मुंबई येथे द्वीतीय वर्षाला वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदीवासी समाजातील तरुणी डॉ. पायल सलमान तडवी यांचा त्यांच्या सोबत असलेल्या सिनिअर डॉक्टर डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महीर, डॉ. अंकीता खंडेलवाल यांनी मिळुन रॅगींग करून जातीवाचक वागणुक देऊन मानसिक छळा केला जात होता. या त्रासाला कंटाळुन अखेर होत असलेले त्रास असहाय झाल्याने डॉ. पायल तडवी हिने मृत्युला कवटाळले व मुंबई येथे राहात असलेल्या वसतीगृहामधील खोलीमध्ये गळफास घेवुन आपली जिवनयात्रा संपवली. या विषयाची गंभीर दखल घेत एम.बी. तडवी यांनी म्हटले आहे की डॉ.पायल तडवी ( स्त्रीरोग) तज्ञ अभ्यास घेणारी होतकरू व आदीवासी तरुणी २०१८ पासुन मुंबई येथील नायर हॉस्पीटल येथे शिक्षण घेत असतांना तिला आदीवासी म्हणुनजी वागणुक दिली गेली अत्यंत दुखःदायी संतापजनक आहे. यापेक्षा ही अधिक मनस्ताप देणारे प्रकार म्हणजे डॉ.पायल तडवी यांच्या आई आबेदा सलीम तडवी यांनी दिनांक १० मे २०१९रोजी आपली मुलगी डॉ.पायल तडवी हिचा नायर हॉस्पीटल मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असतांना त्याच्या सोबत असलेल्या सिनिअर डॉक्टर यांच्याकडुन रॅगींग करून मानासिक छ्ड करण्यात येत असल्याची तक्रार दिली होती व त्यात म्हटले होते की हा प्रकार न थांबल्पास माझी आत्महत्या करू शकते अशी तिची मानसीक स्थिती झाली असल्याचे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले होते. असे असतांना देखील नायर हॉस्पीटलचे डीन, आग्रीपाडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक, यांनी त्या अर्जाची दखल देखील घेतली नाही. जर नायर हॉस्पीटल व पोलीस प्रशासनाने तात्काळ अर्जाची दखल घेतली असती तर या तरुण डॉ.पायल तडवी हिने केलेली आत्महत्या टाळता आली असती, असे सांगुन या तरुणीच्या आत्महत्यास ही मंडळी देखील तितककेच जबाबदार असुन, तात्काळ जर प्रशासना कार्यवाही करून त्या आरोपीना अटक न केल्यास पुढील तिव्र स्वरूपाचे आंदोलन हे मुंबई येथे आझाद मैदानावर करण्यात येणार असल्याचे आदीवासी तडवी भिल्ल एकता संघाच्या माध्यमातुन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Add Comment

Protected Content