पाडळसरे धरणास निधीचे दिलेले आश्वासन 100 टक्के पूर्ण होणार : युवा नेते भिकेश पाटील

 

bhikesh patil

 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण भारत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उदो उदो होऊन रेकॉर्डब्रेक जागा निवडून आल्या आहेत. तर जळगाव मतदार संघातील भाजपा मित्रपक्षाचे उमेदवार खा. उन्मेषदादा पाटील हे देखील राज्यात टॉपच्या मताधिक्याने विजयी झालेत. एवढेच नव्हे तर अमळनेर मतदार संघातील जनतेने देखील तब्बल 60 हजारांचे मताधिक्य त्यांना दिलेय. खरं म्हणजे मोदींच्या नेतृत्वावर असलेला जनतेचा दृढ विश्वास आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत याचेच हे फलित असल्याची भावना युवा नेते तथा भाजयुमोचे तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे सदस्य भिकेश पावभा पाटील यानीं व्यक्त केली आहे.

अमळनेर मतदार संघात खा. उन्मेष पाटील यांच्या प्रचाराची धुरा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत यशस्वीपणे सांभाळणारे भिकेश पाटील यांनी निकालानंतर पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की, जनतेने दिलेल्या या मताधिक्याची परतफेड निश्चितपणे अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाडळसरे धरणाच्या पूर्णत्वाने होईल. हा विश्वास असून तशी ग्वाही देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमळनेर येथे जाहीर सभेत देऊन जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हेच हा प्रश्न सोडवतील असे जाहीरपणे सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर आपण सर्वानी अतिशय मोठया मताधिक्याने निवडून दिलेले खा उन्मेष दादा पाटील हे देखील धरणाच्या प्रश्नाबाबत अत्यंत सकारात्मक असून खासदारकीचा श्रीगणेशा केल्यापासूनच धरणासाठी पाठपुरावा ते करणार आहेत. यामुळे धरणाचा प्रश्न आता निश्चितपणे सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच धरणाव्यतिरिक्त शहर व ग्रामिण भागात अनेक महत्वाचे व ज्वलंत प्रश्न असून त्याकडे देखील आम्ही खासदारांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

उन्मेष पाटलांच्या विजयी गणिताबाबत बोलताना ते म्हणाले की, सुरवातीपासून जळगाव लोकसभेत भाजपाचा उमेदवार कुणीही असो मोदीजी व भाजपास भक्कम पाठबळ देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मतदार संघाचा खासदार निवडलाच पाहिजे, या मानसिकतेत आम्ही होतो. उमेदवारीत पक्षस्तरावर काही अदल बदल देखील झालेत. मात्र अंतिम क्षणी उन्मेष पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर आम्ही कामाला लागलो. मतदानास अवघे 19 दिवस शिल्लक असताना सुष्म नियोजनाकडे आम्ही भर दिला. यात प्रामुख्याने ना.गिरीश महाजन व काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. शहर व ग्रामिण भागात लागलेल्या भक्कम बूथ यंत्रणेचा आम्हाला विशेष फायदा झाला. मोदींची जनतेच्या हृदयात होतेच. त्यामुळे अडचण नव्हतीच. मात्र, तरीही आमच्या कार्यकर्त्यानी प्रचंड मेहनत घेऊन आपला बूथ कसा जास्तीत जास्त प्लस होईल याकडे लक्ष दिले. आमची युवा टीम यंदा विशेष सक्रिय होती. मुख्यमंत्र्यांची सभा आमचा विशेष आत्मविश्वास वाढवून गेली. त्यामुळे आमच्यासह कार्यकर्ते झपाट्याने कामाला लागले आणि अखेर निकालानंतर याचे फलित सर्वांच्या डोळ्यासमोर आहे.

 

आता अशीच ताकद आगामी विधानसभा निवडणुकीत दाखवून पंतप्रधान मोदींजी,मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री ना महाजन यांच्या नेतृत्वात या मतदार संघातून कोणत्याही परिस्थितीत भाजपाचाच आमदार देखील निवडून देऊ, असा विश्वास भिकेश पाटील यांनी व्यक्त केला.

Add Comment

Protected Content