शहरात अभाविपतर्फे अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ महापालिकेसमोर निदर्शने

जळगाव प्रतिनिधी । अर्णब गोस्वामी यांना सुडबुद्धीने महाराष्ट्र सरकारने पोलिसांद्वारा अटक करण्यात आले याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगरतर्फे महापालिकासमोर निदर्शने करण्यात आले.

महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची दडपशाही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना ठाकरे सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी अटक करून लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभाची गलचेपी करण्यात येत आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध करावा तितका कमीच आहे. महाविकास आघाडी सरकारने ज्या प्रकारे सूडबुद्धीने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. त्यावरून महाराष्ट्रात व्यक्तीस्वातंत्र्य उरलं नसून आणीबाणीचा काळ सुरु झाला असे मत अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, जिल्हा संयोजक रितेश चौधरी, नगरमंत्री आदेश पाटील, पवन भोई, हर्षल तांबट, चिराग तायडे, संकेत सोनवणे, चैतन्य बोरसे, अथर्व सूर्यवंशी उपस्थित होते.

Protected Content