१८ वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी ३१ डिसेंबरपर्यंत नांव नोंदणी करून घ्यावी

 

यावल, प्रतिनिधी । रावेर आणि चोपडा या विधानसभा क्षेत्रातील ज्या युवकांचे वय १८ वर्ष पुर्ण झालेले असेल त्या मतदारांनी आपले नांव आपआपल्या मतदार संघातील बिएलओ यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून आपले नांव ३१डिसेंबर २०पर्यंत नोंदवुन घ्यावी असे आवाहन प्रांत अधिकारी कैलास कडलग आणि तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे.

या सदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चोपडा विधानसभा मतदार आणि रावेर विधानसभा मतदारसंघातील युवकांनी ज्यांचे आज रोजी वय १८ वर्ष पुर्ण झाले आहे अशा युवकांनी आपल्या शहरातील मतदान केन्द्र व प्रभाग निहाय तसेच गावात व आदीवासी क्षेत्रातील पाडयावर नेमणुक करण्यात आलेल्या बिएलओ यांच्याकडे मतदार याद्यांमध्ये नांव नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे ३१डिसेंबर २०२० पर्यंत सादर करून आपले नांव मतदार यादीत नोंदणी करून घ्यावी. याकरीता मुख्य निवडणुक आयुक्त मुंबई यांच्या आदेशान्वये रावेर आणि चोपडा विधानसभा मतदारसंघातील नांव नोंदणीची निवडणुक प्रक्रीयापुर्ण करण्यासाठी २०६ बिएलओंची नेमणुक करण्यात आली आहे. या निवडणुक मतदार नांव नोंदणीच्या राष्ट्रीय कार्यात जागृत नागरीकांनी व युवकांनी तसेच सामाजीक कार्य करणाऱ्या संस्थांनी सर्व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात आपला सहभाग नोंदवुन आपआपल्या क्षेत्रातील व परिसरातील १८ वर्ष पुर्ण झालेल्यांची मतदार यादीत नांव नोंदणी करून आपल्या देशातील लोकशाही बळकट करणाऱ्या मतदार नोंदणी अभियानास यशस्वी करावे असे आवाहन विभागीय प्रांत अधिकारी कैलास कडलग , यावलचे तहसीलदार महेश पवार आणि निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांनी केले आहे.

Protected Content