माहिती अधिकार कार्यकर्ताच्या मदतीने निघाला अडचणीवर तोडगा – पालकांनी केला सत्कार

जळगाव, प्रतिनिधी | खासगी शाळेची फी भरू शकत नसल्याने पालकांनी दाखला काढण्यासाठीचा शाळेकडे अर्ज दिला. शाळेने मात्र पूर्ण फी भरल्याशिवाय दाखला देण्यास नकार दिल्यावर माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांच्या माध्यमातून यावर तोडगा निघाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याविषयी अधिक माहिती अशी की, “आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे खासगी शाळेची फी भरु शकत असल्याने पालक सुनील सूर्यवंशी यांनी सहा महिन्यांपूर्वी शाळेत आपल्या पाल्याच्या दाखला काढण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, शाळेने फी पूर्ण भरल्या शिवाय मार्कसीट व दाखला देण्यास नकार दिला.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. परंतु, यावर कोणताही मार्ग निघाला नाही. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधून याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. दीपक कुमार गुप्ता यांनी याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना याबाबत अवगत केले. यानंतर जिल्हाधिकारी यानी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षक अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. यावेळी माध्यमिक शिक्षक अधिकारी यांनी शाळेला पत्र दिले असता शाळा प्रशासनाने त्यांची शाळा विनाअनुदानित असल्याने ही फी भरावीच लागेल असा पवित्र घेतला.

यानंतर कोणताही तोडगा निघत नसल्याने दीपक कुमार गुप्ता यांनी संस्था चालकांशी संपर्क साधून पालकांची आर्थिक अडचणीमुळे तीन वर्षाची थकीत ६३ हजार रुपये देवू शकणार नाही याची जाणीव करून दिली. यावर संस्था चालकांनी देखील सामंजस्याची भूमिका घेत यावर तोडगा काढत ६३ हजारांपैकी ४८ हजार रुपये माफ करत १५ हजार रुपये भरण्यास पालकांना सांगितले.”

तक्रार केल्यानंतर दीपककुमार गुप्ता यांनी आठ दिवसात त्यांची समस्या सोडवली. यामुळे सुनील सूर्यवंशी व त्यांच्या मुलीने दीपक कुमार गुप्ता यांचा त्यांच्या कार्यालयात येवून सत्कार करून त्यांचे आभार मानले.

Protected Content