भुसावळात कोरोनाचा स्फोट : रूग्णसंख्या पुन्हा शतक पार !

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढीस लागली असून आज सलग तिसर्‍या दिवशी रूग्णसंख्या शंभरच्या पार असल्याचे अहवालातून दिसून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या रिपोर्टनुसार भुसावळ तालुक्यात तब्बल १३७ कोरोना पेशंट आढळून आले आहेत. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. १० जानेवारी रोजी तालुक्यात २५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले होते. यानंतर पुढील दिवशी तब्बल चार पटीने म्हणजे १०७ पेशंट आढळून आले. यानंतर यात वाढ होऊन काल म्हणजे १२ जानेवारी रोजी १३५ रूग्णांचे निदान झाले. तर आज यात पुन्हा वाढ होऊन १३७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.

काल शहरातील डीआरएम अर्थात मंडल रेल्वे प्रबंधक यांच्या कार्यालयातील १७ कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. तर, आज शहरासह तालुक्यातील पेशंटची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!