सर्व विद्यार्थ्यांची क्षमताधिष्ठीत प्रगती होण हाच माझा सर्वार्थाने सर्वोच्च पुरस्कार- प्रतिक्षा पाटील

जळगाव, प्रतिनिधी | सर्व विद्यार्थ्यांची क्षमताधिष्ठीत प्रगती माझ्या हातून होण हाच माझा सर्वार्थाने सर्वोच्च पुरस्कार असे भावोद्गार श्री स्वामी समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिक्षा पाटील यांनी काढले.

 

श्री स्वामी समर्थ प्राथमिक,माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसुंबा खुर्द येथे दि .१२ रोजी जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा ” अभियान अंतर्गत भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श समाजशिक्षिका पुरस्कार २०२१- २२ प्रतिक्षा पाटील यांना निवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आकर्षक स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व सावित्री मातेवरील ग्रंथ देऊन सत्कार झाला. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना प्रतिक्षा पाटील बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड असून प्रमुख अतिथी पुस्तक भिशीचे संस्थापक तथा जिल्हा प्रमुख विजय लुल्हे , मौलाना आझाद फौंऊडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख,माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिपाली भदाणे व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात निवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी गायकवाड म्हणाले की, ‘पुरस्कार नैतिक ओझे असतात परिणामी भविष्यात गुणवत्ता उत्तरोत्तर वाढलीच पाहीजे. गुणवत्ता असली तरी आपण कसे आहोत ते सुद्धा सांगता आलं पाहिजे. संस्थेमुळेच आपले आस्तित्व आहे .एकजुटीन काम केलं तरच शिक्षकांची आत्मोन्नती तसेच विद्यार्थ्यांचीही गुणवत्तेची वाढ होऊन संस्थेच्या नावलौकिकाचा आलेख वाढतो.पुस्तक भिशीचे जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी भिशीची संकल्पना व कार्यवाही स्पष्ट करून भिशी अंतर्गत राबविलेले शैक्षणिक,साहित्यिक सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांची माहिती दिली.लुल्हे यांनी पुरस्कारार्थी श्रीमती प्रतिक्षा पाटील यांचे सामाजिक भान, विद्यार्थीनींविषयी तळमळ, उत्तम प्रशासकीय जाण व अचूक राजकीय निर्णयक्षमता या चतुरस्र गुणवैशिष्ट्यांबाबत गौरवोद्गार काढले . प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण गायकवाड साहेबांनी केले . स्वामी समर्थ गृपतर्फे शाल व श्री स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन गायकवाड, लुल्हे व शेख यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास क्रिडा शिक्षक प्रशांत महाजन यांचेसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन हेमंत सोनार यांनी केले .

Protected Content