जलसमाधी आंदोलनाला यश : ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याची ट्रायल यशस्वी

वरणगाव प्रतिनिधी । आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलनाला यश आले. ओझरखेडा धरणात आज दुरुस्तीच्या अनुषंगाने  मशिनींची ट्रायल यशस्वीरित्या पार पडली असून किरकोळ दुरुस्ती झाल्यावर येत्या एक दोन दिवसात जल पूजन कार्यक्रम करून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याचा श्री गणेशा केला जाणार आहे. 

तळवेल उपसा सिंचन योजनेतंर्गत असलेल्या ओझरखेडा धरणात पाणी टाकण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील ढिम्म प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांची पिके मरणासन्न झालेली होती. ही परिस्थिती पाहता आमदार चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत शिवसेना व हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला खाडकन जागे केले. आणि जलसंपदा विभाग युद्धपातळीवर ओझरखेडा धरणात पाणी टाकण्यासाठी अडचणीच्या असलेल्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामात व्यस्थ झाली होती. 

यानुसार आज दुरुस्तीच्या अनुषंगाने  मशिनींची ट्रायल यशस्वी रित्या पार पडली असून अजून  किरकोळ दुरुस्ती झाल्यावर येत्या एक दोन दिवसात  जल पूजन कार्यक्रम करून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याचा श्री गणेशा केला जाणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना व लढ्याला यश आले असून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून शेतकरी बांधवांतर्फे शिवसेना पक्षाचे व आमदारांचे आभार मानले जात आहे.

 

Protected Content