दरोडेखोराला जामनेर पोलिसांनी केली अटक

जामनेर प्रतिनिधी । धुळे येथील दरोड्यातील प्रमुख आरोपीला जामनेर पोलिसांनी गजाआड केले आहे.

याबाबत वृत्त असे की, धुळे तालुका पोस्टे हद्दीतील सांजोरी ते सांजोरी बारी या दरम्यान दि. २४/०६/२०१९ रोजी रात्री फिर्यादी सलिम खान लगोदर खान (वय-३८ धंदा- म्हशी खरेदी विक्री व्यापारी रा- बंडीफरिया ता-महुआ जि. सुरत ) हे ०५ म्हशी, ०३ पारड्या व ०१ पारडा असे सुरत येथुन खरेदी करुन धुळे येथे येत होते. यावेळी कैलास बाबुलाल चव्हाण वय-३४ रा- वरखेडे ता- चाळीसगाव व इतर त्याच्या साथीदारांनी फिर्यादी व साक्षीदारांना मारहाण करुन म्हशी व रोख रक्कम व मोबाईल असा एकुण ०४ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला होता. या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी कैलास बाबुलाल चव्हाण हा तालुक्यातील गारखेडा येथे लपुन असल्याची माहीती मिळाल्यावरुन तात्काळ पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व पोलीस उपनिरीक्षक सुनिल कदम, पो. ना.किशोर परदेशी, योगेश महाजन, प्रकाश चिंचोरे, राहुल पाटील, हंसराज वाघ यांच्या पथकाने सापळा रचुन आरोपी कैलास बाबुलाल चव्हाण (वय-३४ रा. वरखेडे ता. चाळीसगाव) यास ताब्यात घेण्यात आले आहे.

Protected Content