बालिकेचे अपहरण करून अत्याचार करणारा अटकेत

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बिलाखेडा येथील आठ वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणार्‍या नराधमाला पोलिसांनी गजाआड केले आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबत वृत्त असे की, १८ ऑक्टोबर रोजी एक दाम्पत्य हे मजुरीसाठी शेतात गेले होते. याच दिवशी दुपारी त्यांच्या ८ वर्षीय बालिकेचे गोरख भीमराव सोनवणे (वय २२, रा. बिलाखेड) याने अपहरण केले. तिला बिलाखेड शिवारात निर्जन स्थळी झाडाझुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
पीडित बालिकेने घरी येऊन हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. याप्रकरणी गोरख सोनवणे याच्यावर चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात पोस्को कायद्यासह वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी आरोपी गोरख सोनवणे याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे हे करत आहेत.

Protected Content