नियमाचे उल्लंघन करणार्‍या मंडळांविरुद्ध गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । दुर्गोत्सवासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या शहरातील सहा मंडळांविरूध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा देखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे राज्य सरकारने दुर्गोत्सवासाठी काही नियम आखून दिले आहेत. या अनुषंगाने दुर्गोत्सव मंडळांनी चार फुटांपेक्षा अधिक उंच मूर्तीची स्थापना करू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. बहुतांश मंडळांनी याचे पालन केले असले तरी काही ठिकाणी याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहेत.

या अनुषंगाने बाजारपेठ पोलिस स्थानकाचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी आपले सहकारी नंदकिशोर सोनवणे, संदीप परदेशी यांनी पाहणी केली. यात त्यांना सहा मंडळांनी नियमांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींची स्थापना केल्याचे आढळून आले. यासहा दुर्गोत्सव मंडळांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सधी कॉलनीतील कृष्णा नवदुर्गा मंडळ, न्यू सिंधी नवदुर्गा मंडळ, माँ वैष्णवी नवदुर्गा मंडळ, बंब कॉलनीतील ओम साईराम नवदुर्गा मंडळ, न्यू देवीभक्त नवदुर्गा मंडळ आणि फ्रेंड्स ग्रुप नवदुर्गा मंडळ यांचा समावेश आहे.

Protected Content