जळगावातल्या कुंटणखाण्याची मालकीण व दोन दलालांना अटक

जळगाव प्रतिनिधी । येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असून संबंधीत कुंटणखान्याची मालकीण व दोन दलालांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील गंधर्व कॉलनीत हायप्रोफाइल कुंटणखाना चालू असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांना सूचना देऊन पथक तयार केले. या पथकाने दुपारी साडेचारच्या सुमारास गंधर्व कॉलनी भागात सापळा रचला. यात बनावट ग्राहक पाठविल्यावर तरूणीने प्रवेश करताच पोलिसांनी छापा टाकून उपस्थितांना अटक केली.

या कारवाईत कुंटणखाना मालकीण पूजा आत्माराम जाधव (वय २५) हिच्यासह दलाल कमलेश केशरसिंग सिसोदिया (वय २०), प्रवीण सीताराम आहेर (वय ३०) यांच्यासह वीस वर्षीय पीडित यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई उपनिरीक्षक नीता कायटे, रवींद्र गिरासे, अशोक महाजन, दिनेश बडगुजर, रवींद्र घुगे, सुनील पाटील, वैशाली महाजन, मनीषा पाटील, पल्लवी मोरे, छाया मराठे, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content