अमळनेरच्या कोरोना संशयिताचा मृत्यू

अमळनेर प्रतिनिधी । एकीकडे शहरातील दाम्पत्याचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट असाला असतांनाच येथीलच एका कोराना संशयिताचा मृत्यू झाला आहे.

अमळनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील मुंगसे येथील पॉझिटीव्ह महिलेवर उपचार सुरू असतांना शहरात मृत झालेल्या महिलेसह तिच्या पतीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने शहरातील दगडी दरवाजा परिसर सील करण्यात आला आहे. यातील पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार सुरू आहेत. तर यानंतर बुधवारी सायंकाळी शहरातील अमलेश्‍वर नगरात राहणार्‍या एका कोरोना संशयिताचा जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूआधी या संशयिताचा स्वॅब नमुना घेण्यात आला असून याचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

तर दुसरीकडे शहरातील साळी वाडा परिसरात मृत झालेल्या महिलेच्या घराच्या परिसरात फवारणी करण्यात आली असून तिच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content