पहूरच्या जि.प. शाळेत आरोग्य तपासणी

0
5
pahur school medical camp

pahur school medical camp

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । येथील आयएसओ मानांकन प्राप्त संतोषीमातानगर जि.प.प्राथमिक शाळेत राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत नुकतीच शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमात जामनेरच्या उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया पाटील, डॉ.घन:श्याम पाटील व आरोग्य सेविका मोनाली सावळे यांनी १४९ पैकी १२७ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. तर दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी त्यांच्या पालकांच्या उपस्थित करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे उपस्थित होते. डॉ.विजया पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणी पालकांना वैयक्तीक आरोग्य व स्वच्छता संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी शिक्षकांनी सहकार्य केले.