Home Cities जामनेर सावित्रीबाई फुले विदयालयात रक्षाबंधन साजरे

सावित्रीबाई फुले विदयालयात रक्षाबंधन साजरे


vruksharopan

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयात रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे यांनी झाडाला राखी बांधून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

 

सर्व विदयार्थी प्रांगणात राखीच्या प्रतिकृतीत बसले होते. विदयार्थानींनी सर्व विदयार्थ्यांना राख्या बांधल्या.गेल्या आठवडयात शाळेत कार्यशिक्षण गटातर्फे राखी निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या सिमेवरील सैनिकांना पाठविण्यात आल्या आहेत.


Protected Content

Play sound