जामनेर पालिकेचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर

जामनेर प्रतिनिधी । जामनेर पालिकेच्या सन २०१-२२साठी १३९ कोटी रूपये खर्चाच्या आणि २६ लाख रूपये शिलकीच्या अर्थसंकल्पास विशेष ऑनलाइन सभेत मंजुरी देण्यात आली.

जामनेर नगरपालिकेची विशेष ऑनलाईन सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन होत्या. यात१ टक्का कर वाढीच्या रकमेतून आणि शिल्लक २६ लाख या रकमेचा शासकीय निधी आगामी २०२१-२२ या वर्षासाठी शहरातील विविध विकास कामांसाठी वापरला जाईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. यात राज्य नगरोत्थान रस्ते विकासासाठी २० कोटी, वैशिट्यपूर्ण योजनेसाठी १० कोटी, १५व्या वित्त आयोगासाठी ४ कोटी, विशेष रस्त्यांसाठी ३ कोटी अशा ठळक योजनांचा समावेश आहे.

या वेळी उप नगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेविका संध्या जितेंद्र पाटील, महेंद्र बावस्कर, शीतल सोनवणे, अनिस शेख, नाजीम शेख, ज्योती पाटील, ज्योती सोन्ने, लीना पाटील, फारूख मनियार, मंगला माळी, आतिष झाल्टे, कैलास नरवाडे, किरण पोळ, बाबुराव हिवराळे, रिजवान शेख, रतन गायकवाड, ज्योती पाटील, ज्योती सोन्ने, लीना पाटील आदी नगरसेवक उपस्थित होते.

या सभेत मुख्याधिकारी राहुल पाटील, कार्यालयीन अधीक्षक ईश्‍वर पाटील, कर निरीक्षक रविकांत डांगे, नगर अभियंता प्रदीप धनके, संदिप काळे आदींनी प्रशासकीय कामकाज पाहिले.

Protected Content