जळगावातील बिबानगरात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । बिबा नगर येथील ५५ वर्षीय प्रौढाने मध्यरात्री छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, युवराज पुंडलिक पाटील (वय-५५) रा. सेक्टर नं. २ बिबा नगर हे आपल्या दोन मुलांसह राहतात. गुरूवारी रात्री ११.३० वाजता मुलगा रविंद्र युवराज पाटील हा कामावरून आला होता. सोबत जेवण करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्री युवराज पाटील यांनी छताला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुलगा रविंद्र पाटील हा उठल्यानंतर वडीलांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजले. तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोहेकॉ मगन मराठे करीत आहे.

Protected Content