बावरी गँगच्या हद्दपारीचा प्रस्ताव लवकरच- उगले

panjabrao ugale

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कुख्यात बावरी गँगच्या हद्दपारीचा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केली.

जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शहरात अलीकडे झालेल्या बहुतांश घरफोड्यांमध्ये सोनुसिंग बावरी, मोनुसिंग बावरी, गुरूजीतसिंग बावरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबांतील एका अल्पवयीन चोरट्याचा सहभाग उघड झाला आहे. परिणामी या टोळीला हद्दपार करण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. या टोळीचे सदस्य जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

दरम्यान, बावरी गँगचा पर्दाफाश करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलिसांच्या पथकास पोलिस अधीक्षक डॉ.उगले यांनी बक्षीस जाहीर केले आहे. तसेच सोनुसिंग बावरी याच्याकडून २२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यातील काही दागिने संबधित फिर्यादींनी ओळखले आहेत. तर काहींची ओळख पटविणे बाकी असून घरफोडी झालेल्यांनी यासाठी पोलीस दलाकडे संपर्क साधण्याचे आवाहनदेखील डॉ. उगले यांनी केले.

Protected Content