बेंडाळे महिला महाविद्यालयात कोरोना लसीकरण अभियानाला सुरूवात (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील आण्णासाहेब जी. डी.  बेंडाळे महाविद्यालय व  इंडीयन रेडक्रॉस सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयातील विद्यार्थिनीसाठी  दोन दिवशीय मोफत कोवीड लसीकरण अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे.  आज पहिल्या दिवशी  ७५ विद्यार्थींनी कोरोना लस घेतली.

 

कोरोनाचा संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहेत. राज्य शासनाने शाळा महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरण झाल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेशाला निर्बंध लावले आहे. गेल्या दिवसांपासून कोरोनाचा लसींचा तुटवडा जाणवत होता. परंतू आता जिल्ह्यात मुबलक प्रमाणावर लशी उपलब्ध झालेल्या आहे. या अनुषंगाने आज शहरातील बेंडाळे महिला महाविद्यालयात आज सोमवार  २५ ऑक्टोबर रोजी विद्यार्थींनीसाठी मोफत कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले. यात १८ वर्षावरील विद्यार्थींनीसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज इंडीयन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून ३५० लसींचे डोस  उपलब्ध झाल्याची माहिती प्राचार्या डॉ. गौरी राणे यांनी दिली.  शिबिराच्या पहिल्या दिवशी एकुण ७५ विद्यार्थिनीचे लसीकरण करण्यात आल्याची  माहिती  इंडीयन रेडक्रॉस सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा दिली.  यशस्वीतेसाठी इंडीयन रेडक्रॉस सोसायटीच्या मनिषा तायडे आणि योगेश सपकाळे आदींनी परिश्रम घेतले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/589661518850441

 

Protected Content