छत्रपती संभाजीराजे यांना पाठींबा देण्यासाठी मुलाने अडवला ऊर्जामंत्र्यांचा ताफा

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान, या उपोषणाला १२ वर्षीय मुलाने पाठिंबा देत आज ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा अडवला आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसले आहेत. दरम्यान काल रात्रीपासून त्यांची तब्येत खालावली असल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.

अशातच आज शेगाव येथील शिवाजी चौकात एका १२ वर्षीय मराठा मुलाने उर्जामंत्री नितीन राऊतांचा  ताफा अडवला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सुरू असलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचा ताफा अडवला.दरम्यान हा ताफा अडवून मराठा समाजाला आरक्षण  मिळावं याबाबतचं नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आलं आहे. राऊत दोन दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर असून हा ताफा अडविल्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक बघायला मिळाली.

Protected Content