पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे साहित्य लांबविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील रेल गावात पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या ठिकाणाहून सेन्ट्रींग प्लेटा, ग्राईंडर मशीन आणि लोखंडी आसारी असा एकुण १ लाख २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आले. याप्रकरणी चोरी करणाऱ्या तीन जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विनोद मोतिराम पाटील वय ४६ रा. नागलवाडी ता. चोपडा हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बांधकामाचा ठेका घेवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे धरणगाव तालुक्यातील रेल गावात टाकी बांधकाम करण्याचे काम त्यांनी घेतले आहे. त्यामुळे त्यांचे बांधकामासाठी लागणारे सेंट्रींग प्लेटा, ग्राईंडर मशीन आणि आसारी बांधकामाच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. दरम्यान, २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी सेंट्रींग प्लेटा, ग्राईंडर मशीन आणि आसारी असा एकुण १ लाख २० हजार रूपये‍ किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गावात सर्वत्र विचारपूस करून शोध घेतला, बांधकामाच्या ठिकाणावून संशयित आरोपी सुरेश शंकर पावरा, विष्ण दयाराम पावरा आणि शिवा रोहिदास पावरा सर्व रा. रामपुरा ता. शिरपूर जि.धुळे यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. अ

खेर सोमवारी १८ मार्च रोजी रात्री १० वाजता विनोद पाटील यांनी धरणगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात सुरेश शंकर पावरा, विष्ण दयाराम पावरा आणि शिवा रोहिदास पावरा सर्व रा. रामपुरा ता. शिरपूर जि.धुळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.

Protected Content