अंजाळे घाटातील पोलीस चौकी बनली दारूड्यांचा अड्डा

WhatsApp Image 2019 04 04 at 5.42.01 PM

यावल ( प्रतिनिधी)  तालुक्यातील यावल भुसावळ मार्गावरील असलेल्या अंजाळे गावाजवळील घाटावर नागरी सुरक्षासाठी उभारण्यात आलेली पोलीस चौकी हे दारूडे व आंबट शौकीनांसाठी चौपाटी बनली असून पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजे असून, अशा प्रकारे होणाऱ्या गैरवापरांमुळे प्रसंगी काही अप्रीय घटना घडू नये याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरीक करीत आहे.

 

या बाबत चे वृत असे की,  यावल ते भुसावळ या मार्गावर नेहमीच वाहनाची वर्दळ असते हे लक्षात ठेवुन काही परप्रांतीय रस्ता लुट करणारे चोरटे नेहमीच मागावर असतात. या दृष्टीकोणातुन तत्कालीन पोलीस अधिक्षक प्रविण साळुंखे यांनी नागरीकांच्या सुरक्षेला प्रधान्य देवुन अंजाळे गावाजवळच्या घाटावर पोलीस चौकी उभारली. काही दिवस ह्या  पोलीस चौकीवर पोलीसांचा नियमीत बंदोबस्त राहत असे.  मात्र, काही दिवसांनी काही कारणास्तव पोलीस कर्मचारी या अंजाळे घाटाच्या पोलीस चौकीवर नाहीसे झाले. यासोबतच या चौकीची दयनीय अवस्था झाली आहे. चौकीची दारे, खिडक्या मोडकळीस आल्या आहेत. या  पोलीस चौकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या परिसरातील व शहरातील प्रेमविरांचा व काही आंबटशौकीनांचा मोर्चा या रात्रीच्या वेळी र्निमन्यूष्य राहात असलेल्या पोलीस चौकीकडे वळल्याचे वृत आहे.  याबाबत वरिष्ठ पातळीवर तात्काळ गांर्भीने घेवुन , पोलीस चौकीची तुटलेली दारे व खिडक्या दुरुस्त करून विद्युत पुरवठा पुर्वरत सुरू करून ही पोलीस चौकी नागरीकांच्या सुरक्षा सेवेसाठी पोलीस कर्मचारी यांची नियमीत या पाँईटवर नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.

 

Add Comment

Protected Content