जून्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथे मागील भांडणाच्या कारणावरुन तरुणाच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घडली आहे. याप्रकरणी बुधवार, ५ ऑक्टोंबर रोजी परस्पर विरोधात तक्रारीवरुन पाच जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील कानळदा येथे विशाल मनोज पारधी वय २६ हा तरुण राहतो. तो ४ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील मंदिराजवळ असतांना, यावेळी मागीच भांडणाच्या कारणावरुन त्याला प्रमोद सोनवणे याच्यासह एका मुलाने चापटाबुक्क्यांनी तसेच फायटरने मारहाण करुन दुखापत केली, विशाल याची आई भांडण सोडविण्यास आली असता, तिलाही चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, अशा विशाल पारधी याने दिलेल्या तक्रारीवरुन प्रमोद सोनवणे व त्याच्यासोबत असलेल्या एका जणांविरोधात बुधवारी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

तर प्रमोद सुभाष कोळी वय ३७ याने सुध्दा पोलिसात विशाल पारधी विरोधात तक्रार दिली आहे, विशाल हा दारुच्या नशेत बडबड करत होता, त्यास प्रमोद हा रिकामी बडबड करु नको, तिकडे जा, असे बोलला असता, त्याचा राग आल्याने विशाल पारधी, दिपक पारधी व मनोज पारधी या तिघांनी प्रमोद यास फायटरने तसेच लोखंडी रॉडने मारहाण करुन दुखापत केली. या घटनेत प्रमोद हा जखमी झाला आहे, त्याच्या तक्रारीवरुन विशाल मनोज पारधी, दिपक मनोज पारधी व मनोज पारधी तिघे रा. कानळदा या तिघांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही घटनांचा तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड हे करीत आहेत.

Protected Content