विद्यापीठाचे २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाचे विविध पुरस्कार प्रदान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संलग्नित उत्कृष्ट महाविद्यालये, विद्यापीठ, आस्थापना, उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक, संशोधक आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी यांना २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठ, आस्थापना, उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक, संशोधक आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी पुरस्कार यासाठी विद्यापीठाकडे अर्ज नामनिर्देशन प्रस्ताव मागविण्यात आले होते. या प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधितांच्या शैक्षणिक प्रशासकीय कामकाजविषयी माहिती, प्रतवारी, विविध उपाययोजना आणि राबविण्यात आलेले उपक्रम आदी बाबी विचारात घेत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

यात २०१९-२० साठी उत्कृष्ट प्राचार्य, संचालक व महाविद्यालयाचे नाव आहे प्रा. डॉ. संजयकुमार बारी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एज्युकेशन अँड रिसर्च शिरपूर, जिल्हा धुळे तर उत्कृष्ट प्राचार्य, संचालक २०२०-२१ चा पुरस्कार डॉ. राजेंद्र वाघुले धनाजी नाना महाविद्यालय जळगाव यांना प्रदान करण्यात येत आहे.

उत्कृष्ट महाविद्यालय परिसंस्था पुरस्कार २०१९-२० पुरस्कार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एज्युकेशन अँड रिसर्च शिरपूर, जिल्हा धुळे या संस्थेस तर २०२०-२१ चा हा पुरस्कार लेवा एज्युकेशन युनियनच्या डॉ. अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव या महाविद्यालयास देण्यात येत आहे,

उत्कृष्ट शिक्षक महाविद्यालय परिसंस्था २०१९-२०  हा पुरस्कार प्रा.डॉ. प्रकाश एस लोहार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव आणि डॉ. प्रवीण ओमकार पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च शिरपूर जिल्हा धुळे यांना देण्यात आला आहे.

यासह उत्कृष्ट शिक्षक, संशोधक आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी पुरस्कार यासह इतर पुरस्कारही विद्यापीठातर्फे प्रदान करण्यात आले आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कार्यक्षम महाविद्यालय तळमळीने काम करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले असून हा ‘पुरस्कार गौरव समारंभ कार्यक्रम यथावकाश आयोजित करण्यात येणार असल्याचं प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार यांनी पत्रकाद्वारे सांगितलं आहे.

Protected Content