ना. गिरीश महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ना. गिरीश महाजन यांचे आज पहाटे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यात आगमन झाले.

राज्यात नाटकीय घटना झाल्यानंतर सत्तांतर झाले. यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर तब्बल ३९ दिवसांनी राज्य मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला. यात जळगाव जिल्ह्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबत शिंदे गटातर्फे ना. गुलाबराव पाटील यांनी देखील शपथ घेतली.

दरम्यान, शपथ घेतल्यानंतर आज सकाळी सात वाजेच्या सुमारास महानगरी एक्सप्रेसने ना. गिरीशभाऊ महाजन यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी रेल्वे फलाटावर त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करून परिसर दुमदुमल्याचे दिसून आले. रेल्वे फलाटावर भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content