उध्दव ठाकरेंना ‘धनुष्य – बाणा’वरील स्वामीत्व सिध्द करण्यासाठी मिळाली मुदत

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘धनुष्य बाण’ या चिन्हावर नेमकी मालकी कुणाची ? यासाठी उध्दव ठाकरे यांना आज निवडणूक आयोगाने मुदत दिली आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याबाबतचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला चिन्हाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी चार आठवड्यांचा पूर्ण वेळ देण्यास नकार दिला आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठाकरेला गटाला आता केवळ १५ दिवसांचीच मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. 

धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे राहण्यासाठी त्यांना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे. या साठी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगोकडून चार आठवड्यांची मुदत मागितली होती. निवडणूक आयोगाकडून मात्र यासाठी उद्धव ठाकरे गटाला चार आठवड्यांचा पूर्ण वेळ द्यायला नकार देण्यात आला असून आता दि. २३ ऑगस्टपर्यंत त्यांना आपलं म्हणणं निवडणूक आयोगापुढे मांडायचे आहे.

Protected Content