पन्नास हजारासाठी विवाहितेला मारहाण करून छळ

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डोहरी येथील विवाहितेला ५० हजारांची मागणी करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देवून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील डोहरी येथील माहेर असलेल्या विवाहिता विशाखा योगेश सोनवणे (वय-२५) यांचा विवाह भुसावळ तालुक्यातील कन्हाळा येथील योगेश गणेश सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला ओह. लग्नानंतर काही दिवसानंतर विवाहितेला लहान सहान गोष्टींवरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दुचाकी घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावे अशी मागणी केली. पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सासू आणि सासरे यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत विवाहितेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात पती योगेश गणेश सोनवणे, सासरे गणेश धोंडून सोनवणे आणि सासू अलका गणेश सोनवणे तिघे रा. कन्हाळा ता. भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील करीत आहे.

Protected Content