केवायसी करण्याच्या नावाखाली एकाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोबाईल बंद होणार आहे अशी बतावणी करत केवायसी करण्याच्या नावाखाली एकाची ९७ हजार ४९६ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल अमृत पाटील (वय-५७) मुक्ताई नगर जि. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता ते घरी असतांना त्यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. सांगितले की, आपला मोबाईल बंद होणार आहे असे सांगून तुम्हाला केवासी करावी लागणार आहे. असे सांगून सुनिल पाटील यांनी ऑनलाईन फार्म भरण्याचे सांगितले. त्यानुसार सुनिल पाटील यांनी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९७ हजार ४९६ रूपये ऑनलाईन वाळविण्यात आले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात असल्यानंतर सुनिल पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सलीम तडवी करीत आहे.

Protected Content