कोरोना : जिल्ह्यात ५६ बाधित रूग्ण आढळले; ५१ रूग्ण झाले बरे

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात आज जिल्ह्यात ५६ कोरोना बाधित आढळले आहे. तर ५१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच जिल्ह्यात एकुण बाधित रूग्णांचा आकडा ५५ हजाराच्या पार झाला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर- १५, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-२, अमळनेर-०, चोपडा-४, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१५, एरंडोल-०, जामनेर-१, रावेर-०, पारोळा-३, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-१४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ५६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ७ रूग्ण बाधित झाले आहे. त्यापैकी ५३ हजार २८८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४०७ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत आहे. आज जळगाव शहर, भुसावळ आणि यावल मधून प्रत्येकी एक असे तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Protected Content